Jeevan
कर्म
असं आहे कि पुन्हा त्याची फेड करावीच लागते काही कर्म स्थूल असते तर काही सूक्ष्म असते
! हसत हसत केलेले कर्म रडत रडत भोगावे लागते , शक्यतो दुसर्यांना कधी कमी समजू नये
, प्रत्येक मनुष्य स्त्री पुरुष अथवा तृतीयपंथी असेल तो ईश्वराचा अंश आहे असं भगवदगीता
सांगते म्हणून पाहिलं पाऊल म्हणजे पूर्वी केलेले चुकीचे कर्म आठवून त्याची मनापासून
क्षमा मागा म्हणजे प्रायश्चित होईल आणि दुसरं म्हणजे जो दव आवडतो त्याची भक्ती , मंत्र
जप , सुरुवात करा आई वडील पत्नी मुले याना
जितका आनंद देता येईल याचा प्रयत्न करा, !
किती
पाजिले पाणी तू तान्हेल्याला , किती अन्न दिले भुकेल्या जीवाला , किती वेळ दिला प्रभू
चिंतनाला विचारील अंती हरी हे तुम्हाला " या वॉर १००% विश्वास ठेवा होता होईल
तेवढे प्रामाणिक जगा, आत हृदयात बसलेला ईश्वर योग्य वेळी तुमच्या जीवनात नक्कीच एक
चमत्कार करेल आणि करतोच यावर विश्वास ठेवा " मी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
यांचा मी भक्त आहे म्हणून मी सांगतो स्वामीजी सारखे आत्मज्ञानी सत्पुरुष तुमच्या जीवनात
असणे अत्यन्त अत्यन्त आवश्यक अनिवार्य आहे अन्यथा उधळलेल्या रथ सारखी अवस्था होते
, अशी अवस्था झालेली कळत नाही पण ज्यावेळी कळते त्यावेळी वेळ गेलेली असते म्हणून सावध
व्हायला पाहिजे
स्वतः
ला कमी समजणे सतत स्वतःला दोष देणे बंद करा आणि हिम्मत करा कि मी पुन्हा स्वर्ग निर्मिती
करेल पुन्हा माझं विश्व मी उभे करेन बुशीचया जोरावर आणि ईश्वर माझ्या पाठीशी आहे माझ्या
बरोबर मी शंभर कुटुंबाना उभे करेन या विचार शक्ती वर विश्वास ठेवा नवग्रह स्तोत्र अवश्य
पठण केले पाहिजे म्हणजे थोडं मोठ्याने वाचले पाहिजे आणि शिवलिंगावर पाण्याच्या अभिषेक
करत रहा याचा एक विशेष परिणाम जाणवेल ! जगद्गुरू
नरेंद्राचार्यजी महाराज रत्नागिरी हे एक आत्मज्ञानी संत आहेत त्यांचा शोध घ्या तुमचं
हिमालय सारख्या वाटणाऱ्या समस्या अगदी खाली येतील !
अगदी थोडा वेळ थोड़ गांभीर्याने आणि उद्याचा दिवस काही तरी नवीन जगण्याची उमेद घेऊन नक्कीच तुमच्या जीवनात एक कमलाईची बळकटी येईल म्हणून सप्रेम नमस्कार करून सांगतो ,मी गेली २२ वर्ष माझे सद्गुरू जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नाणीजधाम रत्नागिरी ,जीवन उत्तम जगावे म्हणून सर्वाना मार्गदर्शन करताना असे सांगतात कि सर्वच मनुष्याने" विज्ञान ,व्यवहार ,अध्यात्म याची सांगड घालून जगा, डोळे विज्ञानवादी ठेवा , बुद्धी व्यवहारवादी , आणि मन आध्यत्मवादी ठेवून , जगा उत्तम जगाल,
भूत काळात ज्या चुका झाल्यात , चंचल मन , बुद्धी कमजोर , शरीर रोगी , अशा शंभर गोष्टी मुले कलियुगातील मनुष्य हा अधोगती कडे जात आहे , जगद्गुरू माउली सांगतात कि ,जीवनात दुःख येण्याची मुख्य ४ करणे आहेत
१) जीवनात योग्य दूरदृष्टीचे
नियोजन नाही ७५%
२) अध्यात्म हे शास्त्र आहे ते शास्त्रीय दृष्ट्या समजून घ्या १०%
३) विज्ञान व्यवहार आणि आध्यत्म याची सांगड घालून जगत नाही १०%
४) पूर्व कर्म अनुसार नशीब किंवा प्रारब्ध , प्राक्तन या गोष्टीने जीवनात ५% दुःख येते
यावर उपाय बघू ,
संत बोध ,खऱ्या आत्मज्ञानी सद्गुरू ना शरण जाऊन ते खरचं संत आहेत का त्यांची परीक्षा घेऊन मगच त्यांना शरण जावे , खरे संत म्हणजे ज्यांच्या नावात , स्पर्शात , दृष्टीत , सानिध्य्यात सामर्थ्य असते असा सत्पुरुष ( माझे सद्गुरू जगद्गुरू नरेंद्र आचार्यजी महाराज हे आत्मज्ञानी संत आहे हे मी खात्रीने आणि अभिमानाने सांगतो )
तुम्ही म्हणाल कि माझी समस्या वेगळी आहे मला आध्यत्म सांगू नका , माझी समस्या बद्दल बोला ! म्हणून सांगतो कि मुळापासून जीवन बघा , जन्म झाल्या पासून समस्या आलेली नाही आपण कुठे तरी चुकलो आहोत कोणता तरी निर्णय आपला चुकला आहे म्हणून आज आपल्या वॉर हि वेळ आली आहे ! पण निश्चिन्त रहा ईश्वरावर आपल्या आई वडिलांवर जे खरचं आपले आहेत अशा माणसांवर आणि पुन्हा म्हणतो सद्गुरू माउली वर विश्वास ठेवा !
जीव काहीतरी बरं वाईट करून घेतो , विष पितो , फाशी घेतो , इत्यादी दळभद्रे विचार मनात आले तर त्यांना कापून टाका , स्वतः च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा , आत्ता तुम्हाला खार वाटणार नाही पण तुम्ही भक्ती करा जो दव आवडेल त्याची मन पासून कमीत कमी ९ दिवस भक्ती करा आणि स्वप्नातही दुसऱ्याचे वाईट चिंतन करून नका ! तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा असे वागा ,
बोलण्याने कोणालाही दुखवू नका अगदी घरातील कोणालाही , बोलताना नीट म्हणजे दुसऱ्याला आदर पूर्वक बोला , कधी कधी कठोर व्हावे लागते ते सोडून शक्यतो आदर पूर्वक बोला बऱ्याच गोष्टी आपण इगो मुळे नाश करून घेतो ते करू नका !
मला जे मनापासून सुचविण्याची बुद्धी होत आहे ती सांगतो
१) नवग्रह स्तोत्र रोज ९ वेळा मना पासून मोठ्याने वाचा
२) देशी गाईला हिरवा चारा, मेथीची भाजी वगैरे आवर्जून द्या
३) घरातील मंडळींवर खेकसू नका , भांडण झाले तर २ मिनिटे राग ठेवा तिसऱ्या मिनिटाला विसरून जा ,
४) डोकं शांत ठेवून हा प्रसंग का आला त्यावर आता प्राप्त परिस्थितीत मी काय करू शकतो या वर चिंतन करा
५) घरातील कुलदैवत , इष्ट दैवत यांची मनोभावे पूजा करा , तुमच्या कडून अन्नदान , होऊ दे
६) उत्तम तज्ज्ञ ज्योतिषी असतील तर कुंडली काय सांगते तसे खर्चिक नसणारे उपाय करून बघा
७) कर्ज असेल तर मंगल ग्रह उपासना प्रभावी ठरते , शनी ग्रह उपासना , मारुती उपासना प्रभावी ठरते
८) दारू पीत असाल तर कंट्रोल करा , तुमचा प्रभाव तुमच्या पुढच्या पिढीवर होणार आहे ,
९) घरातल्या ना , मुलांना , मित्र मंडळींना , समाजातील विविध घटकांना तुमचा अभिमान वाटेल असेच आचरण आतून आणि बाहेरून करा
१०) शेवटचा महत्वाचे सांगतो " श्री क्षेत्र नाणीजधाम रत्नागिरी येथे माझे सद्गुरू जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भव्य आश्रम आहे तेथे स्वामीजी असतील त्या वेळी अवश्य जाऊन यावे स्वामीजी ना तुम्ही भेटू शकता त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता तेथील सर्व सोयी मोफत आहे एक हि रुपया खरचं नसतो माझ्या सारखे आखो लोक स्वामीजींच्या मार्दर्शनाने आनंदी जीवन जगत आहेत ! स्वामीजींनी चमत्कार केला असे मी म्हणणार नाही त्यांनी दृष्टी दिली आणि पाठीशी खंबीर उभे राहिले आज हि त्यांची कृपेचा अनुभव आम्ही घेत आहोत कोणतीही अंधश्र्ध्दा आम्ही मनात नाही पण माझा आणि लाखो लोकांचा अनुभव तुम्हाला सांगितलं आहे एवढं मी नक्की सांगतो तुम्हाला शुभेच्छा देतो श्री गुरुदेव !
दिवसातून कधीही एकाग्रतेने " गणी गण गणात बोते" या मंत्राचा १० मिनिटे मनापासून जप करा आणि स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचे वाईट चिंटू नका असाल तेथून " जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज याना तुमची समस्या सांगून बघा मी खात्रीने सांगतो तुम्ही तुमच्या समस्येतून सुटलेला असाल हा चमत्कारांचा मार्ग नाही पण अनुभूती येतेच कारण जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे खरे आत्मज्ञानी संत आहेत हे त्रिवार सत्य हा माझा ठाम विश्वास तर आहेच आणि माझा स्वानुभव आहे ! करून बघा मगच विश्वास ठेवा ! please nanijdham official la subscribe
Comments
Post a Comment